आंधी ते बैलाच पाय ….
मंग् तुया जुगाळ जमोजो…!
हथ राजेहो..! ह्याही दिवशी नाई म्हंता तुमी…
तुले म्या नाई म्हतलं काय…?
पन मांगच्या वरशी तू बैल धुवाले गेला होता …..
अन् तुलेच बंडीत टाकून आना लागलं होत….
सारा पोया सुटल्यावर आपले बैल पोयात गेले होते…….
भुलला का तू..! ते जूनं नोका काळू ना हो..!
म्या आता हरिनाम सुरू केलं…. तुमाले मायित नाई काय….?
कायले हरिनामाले बट्टा लावत बे….?
तू त्याचा कदी तेरे नाम करशीन ……काही नेम नाही..!
हेsssघे ..अन् ..जाय लवकर…
येवळ्यात काय होते हो…!
तूले निरा पुरा बंपरच पायजे म्हंत ….!
मंग मी काय फट्या झांबलू काय …..
तुले माहीत हाय ना आपल किती प्रेस्टीज हाय गावात ….!
तुले मी एकटा पाठोत नाही….
मी येतो तुयासांग….!
अस सांगना मग तूमाले याचं हाय म्हनुन…..
चल लवकर …. नदिकळे नोको जाऊ ….
तिकले गावचे पोट्टे जास्त हाय…..आपल्या नाल्याकळे घे….!
बस् बस् बस्…..
भाऊ पयले उलीसाक नास्ता करू तो परेन बैलाले चरू दिऊ …..मग मस्त धु….!
अस म्हंत…..दे बैल धुऱ्यानं सोळून…!
बापाsss लेका लेका श्याम्या…. तू त म्हने तुयाजोळ काहीस नाही..अन् एव्हळा मालं कुठून आनला बे….!
भाऊ तीन दिवसापासून या फिक्रित होतो… जुगाळ जमोला किनी…..!
मानलं गळ्या तुळे …फक्त घरी तुया वहिनीले नाही समजल पाहिजे….! नाहीत रायली कर अन् तेच टर टर करीन….! थे तुम्ही मा वर सोळा ना हो….. इतची खबर कुठीच जानार नाही…!लय टाईम झाला का बे ….अन् बैलं कुठाय…! भाऊ थे त डोयान दिसूनही नाही रायले….!चल पाहू …..तिकळे कुठ गेले नाल्यात…अबे माया पाय फसला…तरी तुले म्हनो बरं……!ओsss रमेस तूये काका अन् थो श्याम्या गेले बैलं घेऊन ….. पोयां भरला तरी आले नाही… ! बंडी घेऊन जाय… बैलं बंडीले बांधून आन……अन् तेयले बंडित टाकून आन….!वर्हाडी मेवा
-सुनिल ढोकणे
तुलसी नगर, मूर्तिजापूर