जगाच्या उत्पत्ती पासून माणसाच्या माणूस बनण्याच्या प्रत्येक टप्प्यावर माणसाला व्यवहार करण्यासाठी कधी वस्तू विनिमय तर कधी चलन ची देवाण घेवाण करून जगावे लागले आहे. त्यातून माणसाला व्यवहार समजला.माणूस समजदार झाला.जसजसा काळ लोटला गेला तसतसा माणूस भ्रमंती करू लागला.नवीन नवीन प्रदेश पादाक्रांत करू लागला.सामाजिक, आर्थिक, राजकीय भान माणसाला येत गेले.त्यातूनच पुढे देश,खंड,प्रांत,प्रदेश राज्य असे घटक निर्माण होऊन सुरळीत जीवण पद्धतीने जगणे सुरू झाले.त्यातून अर्थव्यवस्था उभ्या करण्यात आल्या.चलन म्हणून प्रत्येक देशाने पैसा उभा केला.व्यापार वाढला,प्रत्येक देशाने आपला व्यापार वृध्दिंगत केला.
आपल्या देशाने सुद्धा जागतिकीकरण स्वीकारून तीन दशकांचा काळ ओलांडला आहे.जगाशी जवळीक वाढली,शिक्षण तंत्रज्ञान घरात आले.आपण सर्वजण आर्थिक साक्षर होऊ लागलो. नव्हे तर आपण आर्थिक साक्षर झालो,असे काहीनी जाहीरही करून टाकले.जागतिकीकरण यामुळे काही चांगले तर काही वाईट बदल आपल्या देशात,आपल्या जीवनात झाले असतीलच,यात शंका नाही.
पण आर्थीक उदारीकरण च्या या काळात आपण उदार मात्र झालोच नाही हे मात्र सत्य आहे.
जगण्यासाठी पैसा मिळवणे,पैसाचा उपभोग घेणे हे क्रमप्राप्तच आहे. त्यात काहीच गैर नाही.प्रगती करणं, आणि प्रगती केल्यानंतर आपले जीवन समृध्द करणे,यात सुद्धा काहीच वाईट नाही.पण पैसे किती मिळवले,या वरून प्रगतीचे मोजमाप करणे हे सध्या च्या काळातील मापदंड योग्य वाटत नाही.पैशाने आपली भौतिक,सामाजिक, आर्थिक प्रगती होते,समाजात आपल्याला मान सन्मान मिळतो. पण आपण कोणत्याही बऱ्या वाईट मार्गाने पैसा मिळवण्यासाठी धडपडतो, हे चित्र विचित्र दिसते.जगण्यासाठी संघर्ष जरूर करावा,नव्हे तो करावाच लागतो.पण पैशाने सूख प्राप्तीसाठी कोणत्या प्रकारची सामाजिक जाणिव न ठेवता धावाधाव करत राहणे हे योग्य वाटत नाही.
जीवन सुकर होण्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध झाल्या.कर्ज घेऊन घर बांधणे, वस्तू विकत घेणे,गाड्या विकत घेणे सुरू झाले.त्या घेतलेल्या कर्जाचे हफ्ते
फेडण्यासाठी काहीही विचार न करता आपण आपली क्रयशक्ती पणाला लावत सुटलो.आपण आपले घर,आपले कुटूंब,त्यांच्या गरजा,, गरजा भागविण्यासाठी कर्ज, कर्जाचे हफ्ते यातच आपापले जीवन संपून जात आहे. आता आपल्याला प्रश्न पडतो की मग पैसा नसल्याने कर्ज काढायचे नाही का?मग आपल्या विशिष्ट आयुष्यातील गरजा कधी पूर्ण करायच्या?आयुष्य असच जगायचे का रडत रडत?असे अनेक प्रश्न मनात येतात.
जागतिकीकरण मुळे आपल्या मनावर कंपन्यांनी जाहिरातीद्वारे भौतिक गोष्टींचा इतका भडिमार केला की या गोष्टीशिवाय आपण जगू शकत नाही, अशी भावना आपल्या मनात पक्की केली.आपल्याला त्या वस्तू काहीही करून मिळवाव्याच लागतील,तरच आपण समाजात चांगले दिसू,असू अशी व्यवस्था करून ठेवली.आणि आयुष्यात पैसा मिळवणे व त्या पैशातून या भौतिक स्वरूपातील गोष्टी मिळवून उपभोग घेणे हेच आपल्या जीवनाचे इतिकर्तव्य आहे,असे आपल्यावर ठसवले गेले.आपण सर्वजण याला बळी पडलो.मग आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की या सर्व सुखाच्या गोष्टी आम्ही कधी उपभोगायच्या?आम्ही नुसते राबून राबूनच आयुष्य जगायचे का?हे ही योग्यच आहे.पण खरंच आपल्याला ज्या गोष्टींची गरज नाही असे कितीतरी उपकरणे आपण आपल्या घरात आणून आपली आर्थिक स्थिती कमजोर करून ठेवतो.
बरं असो,,, आपला मुद्दा हा आहे की प्रगती चा मापदंड फक्त पैसा किती मिळवला हा असू नये.प्रगतीचे अनेक मापदंड असू शकतात.समाजामध्ये संपत्ती असणाऱ्या व्यक्ती ला मिळणारी मान्यता पाहून हरेक व्यक्ती संपत्तीच्या मागे पळत सुटला आहे.आपले सामाजिक भान विसरून कोणत्याही बऱ्या वाइट मार्गाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न करताना लोक आपल्या ला दिसत आहेत.म्हणून दुर्दैवाने म्हणावे लागते की पैसा मोठा झाला आहे ….👏👏
निलेश रामभाऊ मोरे
मनभा तालुका कारंजा जी वाशीम 9637547666
Related Stories
September 3, 2024