नाही केला अभ्यास की शेतकरी बाप माझा काठीने चोपायचा !
मजबुरीने का होईना !
पुस्तक हाती धरायचो ..!
बसून एका कोप-यात पुस्तकाकडे नुस्ताच बघायचो !
जेवनापूर्वी व नंतर करावा लागायचा अभ्यास !
उपाश्यापोटी पोटात कावळे नि जेवनानंतर झोपेचा ध्यास!
पण आज कळले त्यामागचे बापाचे तत्वज्ञान!
शिकलो सवरलो समाजात मिळाला मान !
भिती गेली मनातून त्या पुस्तकाविषयीची!
झापडं उघडली आज माझ्या डोळ्यावरची !
कधिकाळी पुस्तकांना घाबरणारा मी ,
आज पुस्तकं माझे सवंगडी बनले ।
भाराभर वाचतो पुस्तके
त्याचे घरी ग्रंथालय झाले !
आज आठवतो तो अज्ञानी बाप ..!
ज्याने भविष्याचे गणीत मांडले ?
त्या निर्जीव की बोलक्या पुस्तकामुळे
आज माझ्या जीवनाचे सोने झाले!
– अरूण विघ्ने
आर्वी