अमरावत : पुलगाव मिलीटरी स्टेशनचे बिग्रेडिअर विनय नायर यांनी नुकताच पुलगाव स्टेशन कमांडर म्हणून पदभार स्विकारला असून त्यांच्या आदेशान्वये अमरावती येथे आज ईसीएचएस हॉस्पीटलमध्ये माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबियांना वैद्यकीय उपचार कार्डचे (न्यू 64 केबी ईसीएचएस कार्ड) वितरण करण्यात आले. पुलगाव स्टेशन कमांडर म्हणून ही त्यांची उत्कृष्ठ कामगिरी ठरली आहे.सामान्यत: अमरावती, यवतमाळ येथील माजी सैनिक व त्यांच्या कुटूबियांना व ज्येष्ठ माजी सैनिकांना ईसीएचएस कार्ड (Ex-Serviceman Contributory Health Scheme) घेण्यासाठी पुलगाव येथील स्टेशन हेडक्वाटरला 200 किमी. चे अंतर पूर्ण करुन जावे लागत होते. मागील एक वर्षात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच जाण्यायेण्यासाठी होणार त्रास, आर्थिक अडचण आदी समस्यांवर या माध्यमातून तोडगा निघाला आहे.
बिग्रेडिअर विनय नायर यांच्या आदेशानुसार अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील माजी सैनिकांना अमरावतीच्या ईसीएचएस हॉस्पीटलमधून ईसीएचएस कार्ड वितरण करण्याचे आदेश त्यांना संबंधित यंत्रणांना दिले. त्यांच्या या निर्णयामुळे अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील हजारो माजी सैनिकांना दिलासा मिळाला असून त्यांच्या या कृतीसाठी सर्व माजी सैनिकांमध्ये त्यांच्याप्रती आदर निर्माण झाला असून सर्वांनी त्यांचे हृदय आभार मानले आहे.
कोविड 19 महामारीच्या संकटातही अमरावती इसीएचएसने जिल्ह्यातील माजी सैनिकांना आरोग्य सेवा-सुविधा पुरविल्या निमित्त स्टेशन हेडक्वाटरचे ॲडम कमांडर कर्नल देवेंद्र करिऑन, ईसीएचएस अमरावतीचे ऑफिसर इनचार्ज निवृत्त विंग कमांडर सी. सिध्दान व येथील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
Related Stories
October 9, 2024