पुणे : पुण्यात शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांनी पुण्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी निबर्ंध अजून कठोर करण्याचा इशारा देताना विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणार्या पुणेकरांना १५ दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाईल असे सांगितले आहे. तसेच पर्यटनस्थळी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना संकट हळूहळू कमी होत असलं तरीही आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकार्यांनी शनिवारी आणि रविवारी दुकाने बंद राहतील असा निर्णय घेतला असून सोमवार ते शुक्रवारच दुकाने राहणार आहेत. परिस्थिती खूप बिघडली तर त्यात बदल करण्यात येईल. पुणेकरांना शनिवारी आणि रविवारी बंद का असा प्रश्न पडला असेल. कारण महाराष्ट्रात करोना कमी होऊ लागला असला तरी रायगड,र%ागिरी, बीड, उस्मानाबाद, पुणे, कोल्हापूर अशा काही ठिकाणी अद्याप प्रमाण जास्त आहे,ह्व असं अजित पवार यांनी वीकेण्ड लॉकडाऊनची घोषणा करताना सांगितलं.
दरम्यान, अजित पवार यांनी यावेळी पर्यटनस्थळी होणार्या गर्दीवरुन संताप व्यक्त केला आहे. लोणावळा, महाबळेश्वर अशा पर्यटनाच्या ठिकाणी शनिवारी, रविवारी खूप गर्दी होत असल्याचे अधिकार्यांनी सांगितले आहे. नागरिक असे का करत आहेत माहिती नाही. नागरिकांनी ही गोष्ट गांभीयार्ने घेण्याची गरज आहे. अनेक लोक राज्याबाहेर जाऊ लागले आहेत. देवदर्शनासाठी जात असतील तर आम्ही अडवणार नाही, हा त्यांचा र्शद्धेचा भाग आहे. पण काही जण ट्रेकिंगला वैगेरे जात आहेत. तसे जर झाले तर पुण्यातील लोक जे बाहेर गेले होते ते परत आल्यानतंर त्यांना १५ दिवस क्वारंटाइन करावं लागेल. तसे आदेश काढावे लागतील, असा इशाराच अजित पवारांनी यावेळी दिला.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024