परिपूर्ण आहार घेण्यावर अनेकांचा भर असतो. फळं आणि भाज्यांचं आहारातलं महत्त्व वादातीत आहे. एका अभ्यासानुसार ताटलीत ४३ या प्रमाणात विविध रंगांच्या भाज्या आणि फळांचं सेवन करणं गरजेचं आहे. त्यातही पिवळ्या रंगाच्या फळं आणि भाज्यांचं सर्वाधिक सेवन केलं गेलं पाहिजे. पिवळ्या रंगाच्या पदार्थांमुळे आरोग्यविषयक लाभ होतात. या लाभांविषयी..
पिवळ्या पदार्थांमध्ये कॅरोटेनॉइड्स असतात. या कॅरोटेनॉइड्समुळे पदार्थाला पिवळा रंग प्राप्त होतो. बीटा केरोटिन आणि बीटा-क्रप्टोस्कँथन अशा दोन घटकांपासून कॅरोटेनॉइड्स बनतात. पिवळी फळं किंवा भाज्या खाल्यानंतर या घटकांचं रूपांतर ‘अ’ जीवनसत्त्वामध्ये होतं.
पिवळी फळं आणि भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण बरंच जास्त असतं. ऑक्सिडंट्समुळे होणारं पेशींचं नुकसान अँटिऑक्सिडंट्समुळे टाळलं जातं. बीटा-क्रप्टोस्कँथन आणि ‘क’ जीवनसत्त्व अँटिऑक्सिडंट्स मानली जातात. यामुळे पेशींचा बचाव होतो.
पिवळी फळं आणि भाज्यांमुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. यातल्या कॅरोटेनॉइड्सचं रूपांतर ‘अ’ जीवनसत्त्वात होत असल्याने डोळ्यांचं सर्वांगिण आरोग्य राखलं जातं. कॅरोटेनॉइड्सच्या चार प्रकारांमुळे स्तनांच्या कॅन्सरचा धोका अनेकपटींनी कमी होतो, असं हॉवर्ड मेडिकल स्कूलने केलेल्या संशोधनातून समोर आलंय.
Related Stories
September 3, 2024