- पिंपळखुटा/स्वाती न.इंगळे
पिंपळखुटा येथील (तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती) संत कृपा क्रीडा मंडळाच्या वतीने दिनांक २० व २१ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेले कबड्डीचे स्थगित करण्यात आलेले आहे.अमरावती जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अमरावती जिल्ह्यात जाहीर केलेल्या संचार बंदी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हे कबड्डी सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती संतकृपा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सूरज गंथडे यांनी सांगितले आहे.
अमरावती जिल्ह्यातील संचार बंदी आणि शासनाच्या नियामाचे पालन म्हणून सामने स्थगितीची कबड्डी आणि क्रीडा प्रेमी यानी नोंद घ्यावी असे आवाहन संतकृपा क्रिडा मंडळाचे अध्यक्ष सूरज गंथडे,उपाध्यक्ष सुनिल ठाकरे,सचिव किरण भिसे,सहसचिव मंगेश कडू, कोषाध्यक्ष रोशन रुद्राकर,उप कोषाध्यक्ष साहिल उके,क्रिडा प्रमुख तेजस नागपुरे,उपक्रिडा प्रमुख ऋतु गावंडे, कर्णधार मनोज कस्तुरे,उपकर्णधार चेतन मेश्राम सह आयोजन समितीने केले आहे.