धामनगाव रेल्वे : धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा पिंपळकोठा परिसरात एका शेतकर्यांना बिबट दिसल्याने शुक्रवारी दिवसभर वन विभागाच्या कर्मचार्यांनी या बिबट्याचा शोध घेतला.मात्र पग मार्क आढळून आले नाही दरम्यान आठ ते दहा गावे बिबट्याच्या दहशतीखाली असून शेतीची कामे खोळंबली आहे.पिंपळखुटा येथील संजय तिरमारे या शेतकरयांला सायंकाळी सात वाजता शेतातून घरी परतत असतांना जाळीचा मारुती या परिसरात बिबट दिसला त हे वृत्त परिसरातील गावात पसरताच शेतात रात्रीला कोनीही गेले नाही दरम्यान शुक्रवारी सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांच्यासह वनपाल किशोर धोत्रे ,वनरक्षक भावना पातळबन्सी ,वनमजूर बबन चव्हाण यांनी या परिसरात बिबट्याचा शोध घेतला मात्र पग मार्क आढळले नाही या भागात सध्या उन्हाळी भुईमूग, हरभरा, गहू तीळ ही पिके घेतली जातात त्यामुळे शेतकरी रात्रीला ओलितासाठी आपल्या शेतात जातात विशेष म्हणजे तसेच चंद्रपूर येथून येऊन सातपुड्याच्या जंगलात वनविभागाने जेरबंद केलेल्या वाघाने २२ ऑक्टोबर २0१८ या काळात मंगरूळ दस्तगीर येथील राजेंद्र नीमकर व अंजनसिंगी येथील मोरेश्वर वाळके यांना या वाघाने ठार केले होते. त्यामुळे वाघाची दहशत या भागात होती. यातच शुक्रवारी बिबट दिसल्याने परिसरातील दहशत पसरली आहे.
शेतकर्यांनी शेतात जाणे टाळले आहे दरम्यान हा बिबट केवळ दोन वर्षाचा असून जंगल परिसर असल्याने त्याचा वावर होऊ शकतो. रात्रीला शेतात पाच ते सात व्यक्ती एकत्रितपणे जावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी केले आहे.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024