अमरावती : रेशीम शेती व रेशीम उद्योगाबाबत जनजागृतीसाठी रेशीम संचालनालयातर्फे रेशीमरथ जिल्ह्यात सर्वदूर फिरणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात हिरवी झेंडी दाखवून त्याचा शुभारंभ करण्यात आला.
आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, रेशीम संचालनालयाचे सुनील भोयर आदी यावेळी उपस्थित होते.
रेशीम उद्योग कृषी व वने यावर आधारित असून, रोजगाराची प्रचंड क्षमता आहे. येथील हवामान त्यासाठी पोषक असून, मोठ्या उत्पादनास वाव आहे. रेशीम उत्पादक शेतकरी बांधवांसाठी शासनाने अनेक उत्तम योजना लागू केल्या आहेत. जिल्ह्यात अधिकाधिक शेतकरी बांधवांना त्याचा लाभ मिळवून देऊन महारेशीम अभियान यशस्वी करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.शेतक-यांना उत्पन्नवाढीसाठी रेशीम व्यवसाय उपयुक्त आहे. याबाबत जनजागृती, प्रशिक्षण आदी कार्यक्रम अभियानाद्वारे राबविण्यात येत असल्याचे श्री. भोयर यांनी सांगितले.
Related Stories
December 2, 2023