- सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांकडून मेळघाटातील आरोग्य केंद्रांची पाहणी
- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : कुपोषणावर मात करण्यासाठी मेळघाटातील दुर्गम भागातील पाड्यापाड्यांवर प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण करून गरजूंना आवश्यक सुविधा व उपचार पुरवावेत, असे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी आज दिले.
आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी आज चिखलदरा तालुक्यातील बिहाली, सलोना व आमझरी या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रास व चिखलदरा ग्रामीण रुग्णालयास भेट दिली आणि तेथील कुपोषित बालके, मनुष्यबळ, औषधींचा साठा, गरोदर मातांना पोषण आहार, वैद्यकीय सुविधा उपकरणे आदीबाबत आढावा घेतला.
यावेळी त्यांनी बिहाली येथील रहिवासी मोती कासदेकर यांच्या पाच महिन्याच्या कुपोषित बालकाची पाहणी करून आस्थेने विचारपूस केली.
यावेळी आमदार राजकुमार पटेल, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक श्रीमती डॉ. तरंगतुषार वारे , सहायक संचालक डॉ. कंदेवाड, डॉ. भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, तहसीलदार श्रीमती माया माने आदी उपस्थित होते.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–