नागपूर/दिल्ली : उत्तराखंडच्या राष्ट्रीय महामार्गाच्या ५ हजार कोटींच्या व १७0 किमी लांबीच्या प्रकल्पांचे आज केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच ८0 किलोमीटरच्या ४00 कोटींच्या महामार्गांचे भूमिपूजन करण्यात आले. उत्तराखंडच्या प्रगती आणि विकासासाठी शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही ना. गडकरी यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत, शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल, ना. सतपाल महाराज, ना. मदन कौशिक, ना. प्रेमचंद अग्रवाल, ना. जन. डॉ. व्हि. के. सिंग आदी उपस्थित होते.
उत्तराखंड राज्याच्या महामार्ग निमार्णामध्ये २0१४ ते २0२0 या सहा वर्षात १९७६ कोटींच्या ८९६ किमी लांबीच्या १३९ योजना पूर्ण करण्यात आल्या. तसेच १६ हजार कोटी खर्चाच्या २१८ किमीच्या १९0 प्रकल्पांचे अवार्ड करण्यात आले. तूर्तास १६ हजार कोटींच्या महामार्ग निर्माणाच्या ८७ परियोजनांवर काम करण्यात येत आहे. कोट्यवधी रुपयांच्या ५७ महामार्गाच्या योजनांची कामे सुरु आहेत. यात अनेक महामार्ग योजनांची कामे ९0 टक्के पेक्षा जास्त झाली असून मार्च २0२१ पासून डिसेंबर २0२१ पयर्ंत या सर्व योजनांची कामे पूर्ण झालेली असतील. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ११२७ कोटी ११९ कामांसाठी खर्च करण्यात येत असून २0२१ मध्ये ६१ कोटी रुपये देयात आले आहे. आतापयर्ंत केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ६४0 कोटी रुपये या राज्याला देण्यात आले आहे. याच कार्यक्रमात ना. गडकरी यांनी दिल्ली डेहराडून इकॉनॉमिक कॉरिडॉरवरून हरिद्वारसाठी नवीन जोडमार्गाची घोषणा केली. यामुळे दिल्लीवरून हरिद्वारला २ तासात पोचता येईल. तसेच सहारनपूर बायपास हा ४९ किमीचा महामार्ग दोन हजार कोटी खर्च करून बांधण्यात येणार आहे, असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.
Contents
hide
Related Stories
December 3, 2024