नवी दिल्ली : आज कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केला आहे. इंधनाचे दर वाढविण्यामागे दोन मुख्य कारणे सांगितली जात आहे. त्यात पहिले कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरांमध्ये झालेली वाढ आणि दुसरे म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारकडून इंधनाच्या मूळ दरावर आकारला जाणारा कर. मात्र या दरवाढीच्या स्थितीतही काही राज्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेत कर कमी केला आहे. नागालॅण्डमधील सरकारनेही इंधवावरील कर कमी केला आहे. नागालॅण्ड सरकारच्या अर्थ विभागाच्या सचिवांनी जारी केलेल्या एक पत्रकामधून कर कमी करण्यासंदर्भातील माहिती दिली आहे. पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्यात आले असून नवीन दर हे २२ फेब्रवारीपासून लागू झाले आहेत.
नागालॅण्ड सरकारने पेट्रोलवर आकारण्यात येणारा कर २९.८0 वरुन २५ टक्क्यांवर आणला आहे. म्हणजेच आता प्रति लीटर पेट्रोलसाठी १८.२६ रुपये कर देण्याऐवजी १६.0४ रुपये कर मोजावो लागणार आहे. तर डिझेलवर आता ११.0८ रुपयाऐवजी १0.५१ रुपये कर द्यावा लागणार आहे. एकंदरितच एक लीटर पेट्रोल २.२२ रुपयांनी तर डिझेल ५७ पैशांनी स्वस्त झालं आहे.
राजस्थानमधील श्रीगंगानगर आणि हमनुमानगढ जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर १00 रुपये प्रति लीटरहून अधिक झाले होते. त्यानंतर राजस्थान सरकारने इंधनावरील कर ३८ टक्क्यांवरुन ३६ टक्क्यांवर आणला. यापूर्वी पश्चिम बंगाल, राजस्थान, आसाम आणि मेघालयमधील राज्य सरकारांनी इंधनावरील कर कमी करण्याची घोषणा केली.
पश्चिम बंगालमध्ये प्रति लीटर पेट्रोल आणि डिझेलवर कर म्हणून आकारण्यात येणार्या रक्कमेमधून सरकसकट एक रुपया कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याप्रमाणे आसाम सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील प्रति लीटर कर पाच रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मेघालय सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणार्या पाच राज्यांच्या शर्यतीमध्ये बाजी मारलीय असे म्हणता येईल. येथील सरकारने प्रति लीटर पेट्रोल मागे ७.४ रुपये तर डिझेलवरील कर ७.१ रुपये प्रति लीटरने कमी केला आहे. मेघालय सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर ३१.६२ वरुन थेट २0 टक्क्यांवर आणला आहे.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024
September 5, 2024