अमरावती : रामगांव रामेश्र्वर ता दारव्हा येथील प्रतिष्ठीत नागरिक जनार्दन पांडूरंगजी वरघट यांचे वडील आयु. पांडूरंगजी वरघट यांचे सोमवार दि. ११ जानेवारी २०२१ रोजी ह्दयविकाराने दु:खद निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, मुली, जावाई, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक स्मशानभूमीत त्यांचेवर सेवानिवृत प्रशासकीय अधिकारी वासुदेवराव गडुनाजी भगत यांचे प्रमुख उपस्थीतीत बौद्ध पद्धतीने अंतीम विधी पार पडला यावेळी नातलग, गावातील व परिसरातील नागरिक बहुतांश संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शोकसभा घेण्यात आली, शोकसभेत सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी वासुदेवराव भगत, प्रतिष्ठीत नागरिक यशवंतराव पवार इत्यादी मान्यवरांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. अंत्यसंस्कार व शोकसभेचे सुत्रसंचालन गजानन वरघट यांनी केले. याप्रसंगी आप्तेष्ठासह परिसरातील असंख्य लोक उपस्थित होते.
Related Stories
September 30, 2024