▪️प्रथम सत्र▪️
▪️पथदर्शक:आव्हाने व उपाय▪️वक्ता:मा.संजय ओरके,पुलगाव
▪️मा.ओरके सरांनी सुंदर असा आढावा घेतला.
▪️उद्देश, प्रेरणा,तत्त्वज्ञान योजना,कृती यानुसार आपण टप्प्याटप्याने गेलो तर आपण पथदर्शकची वाटचाल सुंदर करू शकतो.
▪️पथदर्शक वितरण जबाबदारी प्रत्येक सदस्य यांनी पार पाडणे,जाहिरात व समन्वय या माध्यमातून आपण पथदर्शक ची आर्थिक उलाढाल करू शकतो.
▪️द्वितीय सत्र▪️
▪️गझलेचे अंतरंग:आंबेडकरी परिप्रेक्षात▪️
▪️मा.प्रा.डॉ. सिद्धार्थ भगत सर,यवतमाळ(सुप्रसिद्ध गझलकार)
▪️मा.भगत सरांनी गझलेचा उगम कुठून झाला…याबाबतीत सुरेख अशी गझलेबाबत मांडणी केली.
▪️उर्दू गझल समजल्याशिवाय मराठी गझल समजू शकत नाही.आंबेडकरी गझल मा.वामनदादा कर्डक यांचेपासून सुरू झालेली आहे.गझलेचे तंत्र आत्मसात करता येते.गझल ही मुळातूनच आली पाहीजे.
▪️तिसरे सत्र:पथनाट्य काल आज उद्या
▪️मा.बनसोड सर,यवतमाळ
▪️यांची मुलाखत मा.जगदीश भगत सर यांनी आपल्या शैलीत घेतली.
▪️समारोपीय सत्र
▪️मा.धम्मा कांबळे सर यांनी सांगितले की….आपणास युवक व मुलांच्या कार्यशाळा पथदर्शक च्या माध्यमातून घ्याव्या लागतील.
▪️मा.ओरके सरांनी पथदर्शक च्या माध्यमातून साहीत्य संमेलन घेणे,आंबेडकरी साहित्य कलाकृतीला पुरस्कार देणे,जिल्ह्य़ात पथदर्शक शाखा उघडणे ,कविता,गझल,समीक्षा,ललितलेख इ.च्या कार्यशाळा घेणे इ.बाबत भाष्य केले.
▪️मा.प्रशांत जारोंडे सर यांचे पाहुण्यांच्या हस्ते सत्कार घेण्यात आला.
▪️प्रा.अरविंद पाटील सर,कवी रसपाल शेंदरे सर,कवी प्रकाश बनसोड सर यांनी प्रत्येक सत्राचे संचालन केले.
▪️आभार प्रदर्शन मा.डाॅ.अरविंद पाटील सर यांनी केले.
▪️वर्धा शहरातील साहीत्यक, प्राध्यापक, शिक्षक ,सामाजिक क्षेत्रातील सन्माननीय व्यक्ती यावेळी उपस्थित होते.प्रकाश कांबळे ,प्रा.राजेश डंभारे,विद्यानंद हाडके,अजय हेडावू, अजय तिगावकर, किरण पट्टेवार,पंकज वंजारे,प्रकाश वैद्य,गौतम पाटील,प्रकाश जिंदे,रसपाल शेंदरे,सुषमा पाखरे,प्रशांत ढोले,मोरेश्वर सहारे,थुल,राजेंद्र गणवीर,उमेश गणवीर,सुनिल ढाले,इ.मान्यवर मंडळी यावेळी इंदुदीप सभागृहात उपस्थित होती.
▪️प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ज्यांचे हातभार लागले त्यांचे पथदर्शक परिवार आभार व्यक्त करीत आहे
Related Stories
October 9, 2024