अमरावती : पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनच्या वतीने दिले जाणारे २०१९ वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत त्याच अभ्यास व आकलणाच्या जोरावर राज्यातील विविध प्रश्न अभ्यासपूर्ण मांडणारे अमरावती येथील आपल्याशी समाजाचे अभ्यासू युवा पत्रकार जयंत सुनीता गणेशराव सोनोने यांना यंदाचा लोकनायक बापूजी अणे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. जयंत सोनोने यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नांदगाव खंडेश्वर येथे २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पॉवर ऑफ मीडियाच्या “क्रांती पर्व” या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे.
जयंत सोनोने यांनी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करत असतांनाच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून जनसंवाद व पत्रकारितेचे पदव्युत पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. पत्रकारिता क्षेत्रातील वैविध व आवाका समजून घेण्याकरिता त्यांनी विविध शासकीय कार्यालयात इंटर्नशिप केली. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासोबतच दैनिक दिव्य मराठीच्या अमरावती कार्यालयात पत्रकार म्हणून कामाची सुरुवात केली.
स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करतांना वाचण्यात येणारे विविध पुस्तके, मासिके व नियमित वाचनाचा फायदा झाल्याची माहिती त्यांनी दिली. जयंत सोनोने यांनी याच काळात शोध पत्रकारितेच्या माध्यमातून पोषण आहार पुरविणाऱ्या महिलांंना होणारा त्रास, रखडणारी शिष्यवृत्ती, प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा युवकांना झालेला उपयोग, आंतरजातीय विवाह, तंत्रज्ञानातील बदलांमुळे शासकीय योजनांचे झालेले सुलभीकरण, निवडणूकीतील हायटेक प्रचार यंत्रणा, सायबर क्राईम व मीडिया लिर्टसीची आवश्यकता, सोशल मीडियामुळे निर्माण झालेली सामाजिक परिस्थिती, वाढते अघोरी गर्भपात अशा संवेदनशील विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण लिखान केले आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्राातील उत्कृष्ट कार्यासाठी जयंत सुनिता गणेशराव सोनोने यांना लोकनायक बापूजी अणे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 51 हजार रुपये रोख प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे मुंबई येथे होणाऱ्या समारंभात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धा परिक्षेच्या अनिश्चीत क्षेत्रात येवून अधिकारी होणाच स्वप्न पाहत असतांना जयंत सोनोने यांनी वर्तमान परिस्थितीचे डोळस आकलन करत करिअरचा यशस्वी केलेला ‘प्लॅन बी’ स्पर्धा परिक्षांच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे. राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नांदगाव खंडेश्वर येथे होणाऱ्या पॉवर ऑफ मीडियाच्या “क्रांती पर्व” या कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे.