अमरावती : विकास कशाला म्हणतात हे शब्दांऐवजी कृतीतून करून दाखविणार््यांपैकी मी आहे. पत्रकार भवनासाठी जागा असो किंवा अभ्यासीकेसाठी निधी हे माज्या अखत्यारीतील बाब असल्याने मी ते करू शकलो. जेवढ शक्य आहे ते पूर्ण ताकदीने करायचे असाच माझा स्वभाव आहे. पत्रकारांना घरे देण्याचे स्वप्न माझे अजुनही अपूर्णच आहे. ते पूर्ण करण्यासाठी मी येणार्या काळात प्रयत्नरत राहणार आहे असे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी आज केले.
अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित भव्य अत्याधुनिक अभ्यासीका तसेच ई-लायब्ररीचे उद्धाटन प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते आज पार पडले. यावेळी उद्धाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर चेतन गावंडे, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, मनपा विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्यामसुंदर निकम, डॉ.रवीभूषण आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. पत्रकार भवन स्थित अत्याधुनिक अभ्यासिका तसेच डिजीटल लायब्ररीचे उद्धाटन यावेळी पोटे पाटील यांच्या हस्ते फीत कापून पार पडले. यावेळी बोलताना पोटे पाटील म्हणाले की, आपल्या कार्यकक्षेत असलेल्या बाबी करून आपण समाजात कार्यरत राहणार्या पत्रकारांना न्याय देऊ शकत असेल तर ते केलेच पाहिजे व तेच मी केले. यापुढेही ते करण्याचा माझा मानस राहील. यावेळी महापौर चेतन गावंडे, मनपा आयुक्त रोडे, हर्षवर्धन पवार, बबलू शेखावत तसेच माजी महापौर विलास इंगोले यांची देखील समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलत असताना अनिल अग्रवाल यांनी सांगितले की, पत्रकार भवन आणि अभ्यासिका हा एक महत्वाचा टप्पा आज पत्रकार संघाने पार पाडला असून आता पत्रकारांना हक्काची घरे मिळवून देणे हे माझे ध्येय आहे. सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष तसेच पत्रकार बांधवांच्या मदतीने आम्ही हा गाडा चालवित असून त्याला नक्कीच यश प्राप्त होईल असा मला विश्वास आहे. तसेच पत्रकार भवनाच्या निर्मितीपासून अभ्यासिकेपयर्ंतचा प्रवास उलगडून सांगितला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गौरव इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रफुल्ल घवळे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष चंदू सोजातिया, त्रिदीप वानखडे, संजय शेंडे, सरचिटणीस प्रफुल्ल घवळे, अरूण जोशी, कोषाध्यक्ष सूनील धमार्ळे, सहकोषाध्यक्ष संजय बनारसे, सहचिटणीस संजय पंड्या, चंद्रप्रकाश दुबे, प्रवक्ता मनोहर परिमल, सूधीर भारती, विजय ओडे, यशपाल वरठे, अनुप गाडगे, विवेक दोडके, प्रेम कारेगावकर, जितेंद्र दखणे, प्रणय निर्वाण, बाबा राऊत, दयालनाथ मिर्शा, ऋषीकेश शर्मा, निलेश राऊत, हुक्मीचंद खंडेलवाल, तसेच तालुकाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, पवन शर्मा, नंदकिशोर इंगळे, चंद्रकांत भड, हेमंत निखाडे, संतोष शेंडे, आदींची उपस्थिती होती.
कोरोना योद्ध्यांचा सन्मान
मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने कोरोना काळात सुरूवातीपासूनच आरोग्य सेवेत अवितरपणे कार्य करणा?्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्यामसुंदर निकम, डॉ.रवी भूषण तसेच अमरावती शहराचे प्रशासन उत्कृष्टरित्या सांभाळणारे मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांचा सन्मान अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मानचिन्ह तसेच पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यासोबतच कोरोना काळात नोकरी गेल्यानंतर स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय थाटून आत्मनिर्भर होणारे छायाचित्रकार मनिष जगताप, शेखर जोशी, शशांक नागरे तसेच मंगेश तायडे यांचा सत्कार देखील यावेळी प्रवीण पोटे पाटील तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
Related Stories
October 10, 2024