माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचे पुण्यात निधन झाले. पुण्यातील पहिली एल्गार परिषद ही पी.बी.सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. अतिशय कडक शिस्तीचे न्यायमूर्ती अशी सावंत यांची ओळख होती. ३0 जून १९३0 रोजी पी.बी. सावंत यांचा जन्म झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली. त्यानंतर सावंत यांनी उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सराव सुरू केला. १९७३ मध्ये सावंत यांची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. न्यायामूर्ती पी. बी. सावंत यांनी नवीन वकिलांना सामाजिक न्यायासाठीचा दृष्टीकोन समजावून सांगितला. ते न्यायिक सुधारणांसाठी आग्रही मत मांडत असत. त्वरित कायद्याचा अनव्यार्थ बरोबर की चूक याबद्दल सांगणारा न्यायस्तंभ आता हलवला आहे. २00३ मध्ये राज्य सरकारमधील तत्कालिन मंत्री नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांच्या चौकशीसाठी एक समितीही स्थापन करण्यात आली होती. पी.बी. सावंत हे त्या समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी २३ फेब्रुवारी २00५ मध्ये आपला अहवाल सादर केला होता. त्यात नवाब मलिक, पद्मसिंह पाचील आणि सुरेश जैन यांच्या आरोप ठेवण्यात आले होते. तर विजयकुमार गावित हे दोषमुक्त असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर नवाब मलिक आणि सुरेश जैन यांनी राजीनामा दिला होता.त्यांच्या कार्यकाळात त्यांनी १९८२ मध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची चौकशीही केली. त्यानंतर १९८९ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांचा निकाल लागला. पी. बी. सावंत यांच्या निधनाने त्यांच्या निधनामुळे राज्यातील पुरोगामी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. एक उत्तम कायदेतज्ज्ञ आपल्यातून निघून गेले आहेत. राज्यघटनेची मूल्ये आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन सर्मपित केले होते. केंद्रातील विद्यमान सत्ताधारी लोकशाही आणि संविधानाला पायदळी तुडवून कारभार करत असताना सावंत हे संविधान आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी लढत होते.राजकीय, सामाजिक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याचा नवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी सातत्याने प्रयत्न केला. १९९५ मध्ये ते सेवानवृत्त झाले.
Related Stories
September 3, 2024