मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रश्मिका नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. रश्मिका ही गेल्या काही दिवसांपासून पुष्पा या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रश्मिकाने श्रीवल्ली ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटातला तिचा लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. दरम्यान, रश्मिकाचा साडीतला एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
रश्मिकाने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. रश्मिकाने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. रश्मिकाने ही साडी पुष्पाच्या हैद्राबादमधीस प्रमोशनसाठी परिधान केली होती. रश्मिकाने परिधान केलेली ही साडी लुना साडी म्हणून ओळखली जाते.रश्मिकाने परिधान केलेली ही साडी अंकिता जैनने डिझाईन केली आहे. अंकिता हँडक्राफ्टेड ऑफ व्हाईट ऑर्गेन्झा साडी डिझायनर म्हणून ओळखली जाते. या साडीची किंमत ही ३१ हजार ५00 रुपये आहे, असे वृत्त माध्यमांनी दिले आहे.
रश्मिका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. पुष्पा : ज राइज चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा चित्रपट लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित आहे. ज्यात अभिनेता अल्लू अर्जुनने पुष्पा ही व्यक्तीरेखा साकारली आहे.याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानाचीही मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट १७ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. एवढंच नाही तर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत तेवढीच क्रेझ पाहायला मिळत आहे.