अमरावती : निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र तात्काळ सादर करण्याचे आवाहन अमरावती जिल्हा कोषागाराने केले आहे.
राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतनधारक, माजी आमदार, तसेच इतर राज्य निवृत्तीधारकांची यादी त्यांच्या संबंधित बँक शाखेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. निवृत्तीवेतनधारकांनी बँक शाखेत जाऊन तिथे कोषागार कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या हयात यादीवर स्वाक्षरी करावी. निवृत्तीवेतनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत हयात प्रमाणपत्र सादर न केल्यास पुढील निवृत्तीवेतन काढता येणार नाही. त्याची सर्वांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांनी केले आहे.
प्राप्तीकर कपातीसंबंधी बचतीचे विवरणप्तर व प्राप्तीकर अधिनियमानुसार गणना करून नवीन किंवा जुने विकल्पान्वये प्राप्तीकराची कपात करण्याबाबतचे विवरणपत्र 31 डिसेंबरपूर्वी सादर करण्याचे आवाहन श्रीमती पवार यांनी केले आहे.
(Images Credit : Hindustahan post)