- अविद्येने जन्म। घेणारा निखारा ॥
- जीवाचा मातेरा। करितसे ॥१॥
- विषमता एक । जहरी निखारा॥
- होई कोंडमारा । जीवनाचा॥२॥
- स्री भ्रूण हत्या । उदरी निखारा॥
- कसा हा निवारा। अभ्रकाचा॥३॥
- मद्याचा निखारा । जीनव प्रहार ॥
- उद्ध्वस्त संसार। दारुड्याचा॥४॥
- हुंड्याचा निखारा । संसाराचा घात ॥
- वधू जीवनात । हुंडाबळी॥५॥
- करुनिया नष्ठ । जीवन निखारे॥
- संघर्षाचे वारे । वाहू द्या रे॥६॥
- अभंगकर्ता –
- प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
- रुक्मिणी नगर, अमरावती.
- भ्र.ध्व.:-८०८७७४९६०९
- Email ID:arunbundele1@gmail.com