- * अर्ज सादर करण्याची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व स्वयंसेवी संस्थांकडून नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व स्वयंसेवी संस्थांना दरवर्षी 8 मार्च रोजी नारी शक्ती पुरस्काराने गौरविण्यात येते.
इच्छुक महिला व स्वयंसेवी संस्था यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आपले अर्ज व नामनिर्देशन आवश्यक त्या कागदपत्रासह केवळ ऑनलाईन पध्दतीने www.awards.gov.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत.पुरस्कारासाठी अर्ज व नामनिर्देशन भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ‘दत्तात्रय सदन’, दसरा मैदान रोड, भुतेश्वर चौक, देशपांडेवाडी, अमरावती, भ्रमणध्वनी क्रमांक 0721-2990412 येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.