मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्याच्या विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती खुद्द नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी मला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्याचे मी पालन करुन माझ्या पदाचा राजीनामा विधानसभा उपाध्यक्षांकडे दिला आहे, असे नाना पटोले म्हणाले.
नव्या जबाबदारीबाबत विचारले असता नाना पटोले यांनी अजूनपयर्ंत मला नव्या जबाबदारीबाबत काही कळविण्यात आलेले नाही. मला फक्त विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश हायकमांडकडून आले आहेत, त्याचे मी फक्त पालन केले आहे, असे पटोले म्हणाले.
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023