नांदगाव खंडेश्वर : नांदगाव खंडेश्वर येथे आरोपी मो.आरिफ मो. सुलेमान सय्यद (वय ४५) राहणार टेकडी पुरा नांदगाव खंडेश्वर यांचेकडून २४ जून रोजी पोलिस स्टेशन नांदगाव खंडेश्वर हद्दीतील महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटका व सुगंधित तंबाखू धाड टाकून जप्त करण्यात आला. याबाबत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती दाराकडून खबर मिळाली होती. त्यानुसार नमूद आरोपी हा सुपर कन्फेक्शनरी येथील गोडाऊनमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटका सुगंधित तंबाखू अवैधरित्या विक्री करीता बाळगून आहे अशा खबरे वरून रेड केली असता आरोपीच्या ताब्यातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटका व सुगंधित तंबाखू असा एकूण ३ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एक आरोपी सह पुढील कारवाई पोलिस स्टेशन नांदगाव खंडेश्वर यांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कारवाई माननीय पोलिस अधीक्षक श्री डॉ.हरी बालाजी एन.सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांचे मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक तपण कोल्हे,स्थानिक गुन्हे शाखा अमरावती यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, एएसआय संतोष मुंदाने, जयंतीची रवींद्र बावणे एमपीसी पुरुषोत्तम यादव पी.सी.दिनेश कनोजिया, पो. कॉ. पंकज चाटे. चालक हेडकॉन्स्टेबल नितीन कळमकर नांदगाव येथील ठाणेदार हेमंत ठाकरे, कॉन्स्टेबल भगत, सदा देवकते, कोष्टी, कॉन्स्टेबल मेर्शाम यांनी केली.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024