नवी मुंबई:राज्यात किरकोळ बाजारात कांद्याने उचल खाल्ली असून पन्नाशी गाठली.यामुळे कांद्याचे दर आटोक्यात आणण्यासाठी नाशिक जिल्हय़ात गेल्या महिन्यात सहा कांदा व्यापार्यावर आयकर विभागाने धाडी घातल्या होत्या. त्यानंतर आता मुंबईतील चार निर्यातदारांनी थेट ५९ कंटेनर इराणचा कांदा मुंबईत मागवला.त्यापैकी २४ कंटेनर एपीएमसी मार्केट यार्डात दाखल झाले असून या कांद्याची प्रतवारी करण्याचे काम सध्या सुरू आहे. सोमवारी हा कांदा एपीएमसी घाऊक बाजारात विक्रीसाठी दाखल होणार आहे.
राज्यात गेल्या महिन्यात कांद्याने किरकोळ बाजारात ३५ रुपए किलोवरून ५0 रुपएपर्यंत मजल मारली. तर घाऊक बाजारात २८ ते ३८ रुपए दर होता. विशेष म्हणजे कांदा उत्पादक ओळख असलेल्या नाशिक जिल्हय़ातील सर्वच घाऊक एपीएमसी बाजारपेठत आवक ही कमी होत असताना मागणी वाढली होती. यामुळे कांद्याचे दर नाशिक जिल्हय़ात ही ३५ ते ४0 रुपए झाले होते. साहजिकच मुंबईत त्याचा परिणाम जाणवू लागला. त्यानंतर केंद्राने आयकर विभागाकडून सहा निर्यातदारांवर धाडसत्र घालून कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर नाफेड मार्फत कांदा विक्रीसाठी पाठविण्यात आला.
—–