धूम्रपानाचं व्यसन जडलं की त्यापासून मुक्ती मिळवणं भल्याभल्यांसाठी कठीण ठरतं. मात्र आहारात काही पदार्थांचं सेवन केल्यास या व्यसनापासून दूर राहण्यास मदत होते. यासंबंधी माहती घेऊ या.
ओट्स धूम्रपानाच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी ओट्सचं सेवन महत्त्वपूर्ण ठरतं. दिवसातून एकदा अथवा दोनदा ओट्स खाल्ल्यास धूम्रपानाची तल्लफ कमी होते असं तज्ज्ञ सांगतात. ओट्समध्ये फायबरची चांगली मात्रा असते.
हा घटक शरीरातील वषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो आणि शरीरशुद्धी साधते. ओट्सबरोबर भरपूर पाणी प्यावं. यात सातत्य ठेवल्यास हळूहळू व्यसनापासून मुक्त साधते. मध धूम्रपानाचं व्यसन दूर करण्यासाठी मधाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. मधात प्रोटीन आणि व्हिटॅमिन्सची भरपूर मात्रा असते. त्यामुळे दररोज एक चमचा मध खाल्ल्याने शरीराला लाभ मिळतोच शिवाय व्यसनमुक्तीला बळ मिळतं. मुळ्याच्या सेवनाने धूम्रपानाची सवय सुटू शकते. मुळा सॅलेड अथवा भाजीस्वरुपात खाता येतो. चेन स्मोकर्सनी आहारात मुळ्याचं प्रमाण वाढवल्यास चांगले परिणाम बघायला मिळतात.
ज्येष्ठमधाच्या सेवनामुळे धूम्रपानाच्या व्यसनापासून दूर जाण्यास मदत होते. सिगारेट पिण्याची तल्लफ येताच ज्येष्ठमधाचे तुकडे चिघळावेत. दिवसातून एक-दोन वेळा ज्येष्ठमध चघळल्यास धूम्रपानाची इच्छा होत नाही. भरपूर पाणी पणं हादेखील धूम्रपानापासून दूर राहण्याचा एक चांगला पर्याय आहे.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023