नवी दिल्ली : कर्नाटक-केरळ या दोन राज्यांना जोडणार्या कोच्ची-मंगळुरू गॅस पाइपलाइन पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला अर्पण केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वार मोदींनी योजनेचे उद््घाटन केले. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, हा प्रकल्प पूर्ण करताना असंख्य समस्या आल्या. पण मजुरांनी, अभियंत्यांनी, शेतकर्यांनी आणि राज्य सरकारांनी केलेल्या सहकार्यामुळे हे काम पूर्ण झाले. म्हटले तर ही फक्त पाइपलाइन आहे. पण, दोन्ही राज्यांच्या विकासात याची भूमिका महत्त्वाची असणार आहे. ४५0 किमी लांब कोच्ची-मंगळुरू नैसर्गिक वायू पाइपलाइन देशाला अर्पण करताना मला अभिमानास्पद वाटत आहे. ही पाइपलाइन जीवनमान उंचावण्यासाठी मदत करेल, असेही मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले, विकासाला प्राधान्य देऊन सर्वांनी सोबत मिळून काम केले, तर कोणतेही लक्ष्य अवघड नाही. कोच्ची-मंगळुरू गॅस पाइपलाइन याचे मोठे उदाहरण आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या मुद्द्यावर राज्य आणि केंद्राने सोबत करण्याचे आवाहन केले. यावेळी देशात सीएनजीचे जाळे दुप्पट करण्याची घोषणाही मोदींनी केली.
देशात २0१४ पयर्ंत १४ कोटी एलपीजी कनेक्शन होते. मागील सहा वर्षांच्या काळात इतकेच नवीन कनेक्शन देण्यात आले. उज्जवला योजनेमुळे ८ कोटी कुटुंबांपर्यंत गॅस पोहोचला आहे. २0१४ पयर्ंत देशात फक्त २५ लाख पीएनजी कनेक्शन होते. आज देशात ७२ लाखांपेक्षा जास्त घरांमध्ये गॅस पाइपलाइन पोहोचली आहे.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024