मुंबई, : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. 19 जुलै व बुधवार 20 जुलै रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
मुंबईसारख्या महानगरात आपत्ती व्यवस्थापन हे आव्हानात्मक काम आहे. महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हे कार्य कसे करतो, पावसाळ्यात त्याचे काय नियोजन असते याबाबत सविस्तर माहिती संचालक श्री. नार्वेकर यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली.