मुंबई : अभिनेत्री दीया मिर्जाने १५ फेब्रुवारी रोजी उद्योगपती वैभव रेखीसोबत लगनगाठ बांधली. लग्नातील वधूच्या वेषामधील तिचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लाल रंगाच्या बनारसी साडीत दीयाचा मोहक लूक पाहून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे. दीयाने लग्नासाठी लाल रंगाची बनारसी साडी निवडली होती. गोल्डन एम्ब्रायडरी लाल बनारसी साडीसोबत दीयाने आपला ब्रायडल लूक कम्प्लिट केला होता. हेवी नेकलेस आणि इअररिंग्ज तिने घातल्या होत्या. हातात चूडा नव्हे तर नेकलेसला मॅच करणाया बांगड्या, कपाळावर बिंदीनेदेखील दीयाच्या लूकमध्ये चारचांद लावले. दीयाने केसांचा अंबाडा घालून गर्जयाने हेअर स्टाईल केली होती.
तिचा पती वैभव रेखीदेखील व्हाईट शेरवानी आणि पगडी बांधलेले दिसले. रेड साडीमध्ये दीयाचा ब्रायडल लूक आणि व्हाईट शेरवानीमध्ये पती वैभवचा लूक एकमेकांच्या कपड्यांच्या रंगाला कॉन्ट्रास्ट करताना दिसत होता. रिपोर्ट्सनुसार, दीया आणि वैभवच्या लग्नात तिचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय सहभागी झाले होते. लग्नात ५0 लोक उपस्थित होते, अशीही चर्चा होती. लग्नाआधी दीयाच्या प्री-वेडिंग फंक्शंसचे फोटो समोर आले होते. तिने मेहंदीचे फोटोज शेअर केले होते.
लग्नात दीयाची मैत्रीण, अभिनेत्री अदिती राव हैदरीदेखील हजर होती. तिने वराचे बूट चोरले होते. बूटसोबतचा एक फोटोदेखील तिने शेअर केला होता. यावेळी अदितीदेखील गडद गुलाबी रंगाच्या साडीत दिसली. लग्नात दीयाने उपस्थित असणार्या प्रसारमाध्यमांनाही मिठाई वाटली. फॅन्स दीयाला सोशल मीडियावर लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024
September 5, 2024