दारव्हा: येथील कृषी विभागाच्या रोपवाटिकेजवळील शेतात रविवारी दुपारी भीषण आग लागली. प्रशासनाने वेळीच आग लागली. प्रशासनाने वेळीच अग्निशामक दलाच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण मिळविले. दिग्रस मार्गावर असलेल्या कृषी विभागाच्या रोपवाटिकेजवळील शेतात अज्ञात व्यक्तीने धुरा पेटविला. हवेमुळे ठिणगी शेजारील शेतात उडाली. त्यामुळे गवत पेटत गेल्याने अचानक आगीने रौद्र रुप धारण केले. नायब तहसीलदार संजय जाधव घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024
September 5, 2024