दातांमधली पोकळी अनेक समस्यांना कारणीभूत ठरते. यामुळे शारीरिक वेदना होतात. मानसिकदृष्ट्याही आपण अस्वस्थ होतो. त्यामुळे या समस्येला प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे. या लेखातून दातांमधल्या पोकळ्यांची समस्या टाळण्यासाठीच्या उपायांविषयी जाणून घेऊया..
स्वत:चं संरक्षण करण्याची क्षमता दातांमध्ये असते. तोंडातल्या लाळेत ही क्षमता असते. दातांवरचा एनामलचा थर टिकवून ठेवण्यात लाळ महत्त्वाची भूमिका बजावते. पण अँसिडचा हल्ला परतवून लावण्यासाठी एवढंच पुरेसं नाही. या आम्लामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होते. तसंच दातांची झीज होते. हे टाळ्यण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात.
दातांची योग्य काळजी घ्यायला हवी. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दात घासायला हवे. दातांत अन्नकण अडकणार नाहीत याकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवं.दिवसातून दोन वेळा माउथवॉशचा वापर करा.
विशिष्ट प्रकारच्या अन्नामुळे तोंडात बॅक्टेरियांची निर्मिती होते. साखर तसंच कबरेदकांमुळे बॅक्टेरियांची झपाट्याने वाढ होते. त्यांची पुर्ननिर्मिती होते.
हे बॅक्टेरिया विशिष्ट प्रकारच्या आम्लाची निर्मिती करतात. या आम्लामुळे दातांवरच्या एनामेलची हानी होती. एनामेल हे दातांवरचं संरक्षक कवच मानलं जातं.मध, चॉकलेट, कॅरेमलसारख्या पदार्थांमुळे तोंडात बॅक्टेरियांची वाढ होते. दात आणि हिरड्या आरोग्यदायी राहण्यासाठी फ्लोराइड्सवर भर दिला जातो. साध्या पाण्यातून फ्लोराइड्स मिळतात. त्यामुळे शक्यतो नळाचं शुद्ध पाणी प्यायला हवं. बाटलीबंद पाण्यातून फ्लोराइड्स काढून टाकले जातात. त्यामुळे असं पाणी पिऊ नये.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023