सध्याचा जमाना दाढी ठेवण्याचा असला तरी दाढी वाढवून ठेवल्यावर ती कमी करणं किंवा पूर्णपणे काढून टाकणं थोडं जड जातं. पण दाढी काढायचं ठरवलंच असेल तर कामाला लागायला हवं. दाढीवरून ट्रिमर फिरवला की काम झालं असं नसतं. दाढी काढण्याची प्रक्रिया असते. ती समजून घेऊ ..
बराच काळ दाढी ठेवल्यानंतर क्लिन शेव्हच्या प्रक्रियेशी त्वचेने जुळवून घ्यायला हवं. म्हणून दाढी करण्याआधी त्वचेचं आरोग्य जपण्याच्या उद्देशाने पूर्वतयारी करा. त्वचेवरची छद्र खुली झाल्यानंतर दाढी करावी. आंघोळीनंतर त्वचेवरची छिद्र खुली झालेली असतात.
दाढीनंतर चेहरा धुवावा असा समज आहे. अनेकजण दाढी पूर्ण होण्याआधीच चेहरा स्वच्छ करतात. पण हे चूक आहे. दाढी केल्यानंतर क्रिमचा फेस चेहर्यावर तसाच राहतो. त्यामुळे पूर्ण दाढी झाल्यानंतरच चेहरा धुवा.
काहींना जाडसर, दाट दाढी शोभून दिसत असली तरी सध्याच्या ट्रेंडनुसार रहा. आपल्या चेहर्याला, व्यक्तिमत्त्वाला काय शोभून दिसेल ते बघा. तरूण दिसायचं तर क्लिन शेव्ह करावं लागेल. स्टायलिश आणि थोडं मॅच्युअर दिसायचं तर तुम्ही दाढी ठेऊ शकता.
एका र्मयादेपर्यंत सेलिब्रिटींना फॉलो करा. तुम्ही दाढी ठेवली किंवा काढली तरी ट्रेंडी लूक दिसायला हवा हे लक्षात घ्या.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023