- युवराज जगताप
बार्शी : दत्त प्राथमिक विद्यामंदिर व दिलीपराव सोपल प्रशाला चव्हाण प्लाॅट उपळाई रोड बार्शी येथे इ.१ली च्या मुलांना गणवेश वाटप,वाॅटर प्युरिफायरचे उद्घाटन,१०वी गुणवंत विध्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती क्रि.शि व समाजसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन (आण्णा) ठोंगे, प्रमुख पाहुणे न.पा.शि. मंडळ,बार्शीचे प्रशासनाधिकारी मा.श्री. अनिल बनसोडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून पर्यवेक्षक मा.श्री. संजय पाटील,सौ.निता हुंडेकरी,सौ. संध्या स्वामी मॅडम,सुधाकर चेचे सर,द.प्रा.वि. मंदिरचे मुख्या. श्री.सादिक बागवान सर,दिलीपराव सोपल प्रशालेचे मुख्या.श्री. चंद्रकांत लोखंडे सर हे होते.
कार्यक्रमाची सुरूवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.कै.सुरेश चंद्रकांत मठपती यांच्या स्मरणार्थ श्रीमती अरुणा सुरेश मठपती मॅडम यांच्याकडून इ.१ली तील मुलांना गणवेश तसेच इ.४थी मधील सुरज लक्ष्मण भोसले याला दत्तक घेऊन १०वी पर्यतचा शैक्षणिक खर्च करण्याचे ठरविले त्यास शैक्षणिक साहित्य व इ. १ ली मधील मुलांना गणवेश वाटप तसेच मठपती मॅडम यांचे जावई श्री.श्रीपाद गायकवाड (पुणे)यांनी कै.अशोक गायकवाड यांच्या स्मरणार्थ प्रशालेस वाॅटर प्युरिफायर भेट दिला त्याचे उद्घाटन, इ १०वी परिक्षेत प्रथम क्र.पारूल यादव, द्वितीय क्र.किरण भोसले,तृतिय क्र.नरेंद्र बनसोडे व चतुर्थ क्र.पायल कानडे या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.प्रमुख पाहुणे मा.श्री. अनिलजी बनसोडे ,सुधाकर चेचे सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच मा.श्री.मोहन (आण्णा)ठोंगे यांनी अध्यक्षीय भाषणातून शालेय प्रगतीचा लेखाजोखा सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.सादिक बागवान सर,चंद्रकांत लोखंडे सर श्रीम. संगिता काळे,श्री.श्रीकांत कुंभारे,श्रीम. अरूणा मठपती, श्री.सुनिल लंगोटे,श्री.मंगेश मोरे, सचिन काळे, राहूल ठोंगे सौ.विलंबिनी पाटील, संदिप भोरे या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. पालक,विद्यार्थी मोठयासंखेने उपस्थित होते सुत्रसंचलन व आभार श्रीकांत कुंभारे सर यांनी मानले.