विंटर स्टायलिंगमध्ये महत्त्वाची भूमिका असते ती स्कार्फची..आकर्षक डिझाईन्सचे स्कार्फ तमाम महिलावर्गाचे लक्ष वेधत आहेत. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतींनी स्कार्फ बांधू शकता. आजकाल ट्रेंड आहे तो बेल्टेड स्कार्फचा, म्हणजेच तुमच्या बेल्टसोबत स्कार्फ बांधण्याचा. तर पाहू याच्या वेगवेगळ्या पद्धती..
* बेल्टेड स्कार्फ लूकसाठी स्कार्फची निवड योग्य असायला हवी. ही स्टाईल फॉलो करण्यासाठी खूप जाड स्कार्फ घेऊ नका. सिल्क किंवा लाइट वेट कॉटनचा स्कार्फ निवडा. * तुमच्या स्कार्फच्या वजनावर बेल्टचा आकार ठरवा. स्कार्फचे कापड जाड असेल तेवढा मोठय़ा आकारचा बेल्ट असावा. या लूकसाठी जाड किंवा मेटल बेल्ट योग्य ठरणार नाही. बेल्टेड स्कार्फ लूकसाठी बारीक बेल्ट आणि कमी वजनाचा स्कार्फ हे कॉम्बीनेशन योग्य आहे. बेल्ट तुमच्या कमरेच्या आकाराचा असू द्या. तो कमरेच्या थोडा वर बांधा. यामुळे बेल्टच्या खाली आणि आजूबाजूला स्कार्फ येऊ शकेल. * या लूकसाठी स्कार्फही हलता राहायला हवा. तो एकदम टाईट बसला तर या लूकची मजा जाईल. त्यामुळे स्कार्फची टोके बांधू नका. * बेल्टेड स्कार्फ बांधल्यावर स्कार्फ तुमच्या गुडघ्याच्या थोडासा वर असू द्या.
Related Stories
September 3, 2024