- तेंव्हा एक पैसा, एक आणा, चार आने,
- आठ आण्यांना किंमत होती.
- आत्ता शंभर, दोनशे, पाचशे रुपये,
- इतकेच नव्हे दोन हजार रुपयांनाही किंमत नाही !
- माणसाची पत वाढली, की
- महागाई वाढली – कळत नाही !
- एक मात्र नक्की –
- आज माणसाला किंमत उरली नाही !
- पैसा मोठा झाला आहे,
- की माणूसच खोटा झाला आहे,
- दोन हजाराच्या नोटेपेक्षा
- एक आणाच बरा होता !
- माणसांत माणुसकी होती
- पैशासाठी जीवघेणी शर्यत नव्हती,
- प्रामाणिकपणे काम होत होते,
- त्याच्या नावाने सौदेबाजी नव्हती !
- आई होती – मम्मी नव्हती,
- बाबा होते- डॅड नव्हते,
- एकत्र सर्व नांदत होते,
- वन – टू. बीएचकेची खुराडे नव्हती !
- वृद्धाश्रम नव्हते,
- वृद्धांना प्रतिष्ठा होती,
- गरिबी होती ;
- परंतु वैचारिक दारिद्र्य नव्हते !
- माणूसकीने ओथंबलेली
- ‘माणसं’ होती
- कोल्ह्या-लांडग्यांसारखी श्वापदं नव्हती !
- -सिद्धार्थ कांबळे
- मुंबई
Emage Crdit : Weekipidia