- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : जाई फाउंडेशन मुंबई महा. 49/2021 द्वारा संचालित शब्दवेल साहित्य मंच मुंबईचे तिसरे शब्दवेल साहित्य संमेलन विद्येचे माहेरघर पुणे येथे कॉस्मोपॉलिटीन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१जानेवारी व २२ जानेवारी २०२३ रोजी आझम कॅम्पस असेंब्ली हॉल छावणी परिसर पुणे येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
संमेलनाचे अध्यक्षस्थान साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिका मा.आसावरी काकडे ह्या भूषविणार असून ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मा.भारत सासणे संमेलनाचे उदघाटन करतील.स्वागताध्यक्ष पदी कॉस्मोपॉलिटीन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. पी. ए. इनामदार सर,प्रमुख अतिथी म्हणून मा.मेहबुब कासार (राज्यकर उपायुक्त GST विभाग,मुंबई) तर समारोपीय सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून मा. पुष्पराज गावंडे (सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ)यांची निवड करण्यात आली आहे.
या दोन दिवसीय संमेलनात उदघाटन सोहळा,निमंत्रितांचे कविसंमेलन,परिसंवाद, प्रकट मुलाखत,गझल मुशायरा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा असे सत्रनिहाय दर्जेदार आयोजन करण्यात आले आहे.साहित्यिकांनी जास्तीतजास्त संख्येने संमेलनास उपस्थित राहून ह्या साहित्य मेजवानीचा आस्वाद घेण्याचे आवाहन शब्दवेल साहित्य मंच मुंबईचे अध्यक्ष प्रवीण बोपुलकर ,शब्दवेल केंद्रीय कार्यकारिणी सदस्य श्री आबासाहेब कडू, अमरावती व शब्दवेल अमरावतीचे जिल्हाध्यक्ष श्री अशोक उघडे ह्यांनी केलेले आहे.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–