तिवसा : तालुक्यातील एकूण ४५ ग्रा प सरपंच पदाचे आरक्षण दिनांक २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालय सभागृहात घोषित होणार असून उपस्थितांना मास्क लावूनच प्रवेश दिला जाईल अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार वैभव फरतारे यांनी दिली. तालुक्यातील २९ ग्रा प. च्या निवडणुका संपन्न झाल्या मात्र या सरपंच कोणत्या प्रवगार्तील राहणार याबाबत चचेर्ला उधाण आले होते आयोगाच्या निदेर्शानुसार ५0 टक्के महिला आरक्षण अर्थात २३ महिलांची हक्काचा ग्रामपंचायतीवर वर्णी लागणार याशिवाय तडजोडीच्या राजकारणात महिला आरक्षण सरपंच आकडा वाढणार असे असले तरी अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण पूर्वीप्रमाणेच कायम राहणार इतर मागासवर्गीय व खुला प्रवगार्तील महिला-पुरुष सरपंच पद आरक्षण आज जाहीर केल्या जाणार आरक्षण निश्चित होताच आपल्या गटाचा सरपंच विराजमान करण्यासाठी गावनेते व राजकीय नेते आपले वर्चस्व कायम ठेवण्या करीता धडपड करणार हे मात्र निश्चित.
Related Stories
October 10, 2024