यवतमाळ : निवडून आलेल्या दिनांकापासून बारा महिन्याच्या आत जात वैधता पडताळनी समितीने निर्गमित केलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे ढाणकी नगरपंचायतच्या दोन नगरसेवकावर २८ जुलै रोजी अपात्रतेची कारवाई करण्यात आली. अपात्र नगरसेवक रमेष लक्ष्मण पराते हे प्रभाग क्र. १३ मधून अनु.जमाती या प्रवर्गामधून निवडून आले तर मंदाकीनी दिलीप नंदनवार हया प्रभाग क्र. १२ मधून अनु.जमाती महिला राखीव या प्रवगार्तून निवडून आलेल्या नगरसेवक आहेत. रमेष परातेव मंदाकीनी नंदनवार या दोन्ही नगरसेवकांनी निवडणूक लढविण्यापूर्वी हमीपत्र सादर केले होते. २0१९ ची निवडणूक हलबी समाजाचे अपात्र नगरसेवक रमेष पराते व मंदाकीनी नंदनवार यांनी अनु.जमाती या आरक्षित जागेवर निवडून देखील आले.
जातवैधता पडताळणी समिती अमरावती यांच्याकडे त्यांनी अनु.जमाती या प्रवगार्तील हलबी या जातीची पडताळणी करावी असा विनंती अर्ज निवडून आल्याच्या काहि दिवसानंतर केला होता.मात्र मा.उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी रमेश परात ेव मंदाकिनी नंदनवार अनु.जमाती या प्रवगार्तील हलबी या जातीचा केलेला दावा अवैद्य ठरविला आहे.तसेच जात पडताळणी समितीने उपविभागीय अधिकारी उमरखेड यांनी रमेष पराते व मंदाकीनी नंदनवार यांना हलबी या जातीचा अनु.जमाती या प्रवगार्बाबत दिलेला जातीचा दाखला रद्द केला आहे.
या दोन्ही नगरसेवकांनी जात वैधता प्रमाणपत्र नगरपंचायत कार्यालय ढाणकी येथे सादर केले. नसल्याचा अहवाल मुख्याधिकारी सुरडकर यांनी जिल्हाधीकारी कार्यालयास कळविले. संपूर्ण परिस्थीतीचे अवलोकन व नगरसेवकांचे म्हणने ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या न्यायालयाने दोन नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई केली.त्यामुळे नगरपंचायतच्या राजकारनात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.