डोळ्यांचा मेक अप करताना विशेष काळजी घ्यावी लागते. या धर्तीवर डोळे सुंदर बनवण्याच्या कामी ब्लॅक पेन्सिल लायनरची मोठी मदत मिळते हे लक्षात घ्यायला हवं. परंतु दमट वातावरणात लायनर वितळल्याचं दिसतं. त्यामुळे वरच्या पापणीजवळ स्मिज साचतो. अगदी वॉटरप्रूफ आयलायनरही टिकत नाही. विशेषत: उन्हाळ्यात हे अधिक घडतं. यासाठी पावडर श्ॉडोचा वापर करा. हे तेलकट नसल्यामुळे बराच काळ टिकतं. त्यापासून स्मज निर्माण झाला तरी पटकन दिसून येत नाही. लक्विड लायनरकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं. कारण ते लावणं कठीण असतं. मात्र हे लायनर लावण्यास शिकल्यास त्याच्यासारखं स्वच्छ, सुरेख रेषा काढता येण्याजोगा आणि स्मिज निर्माण न करणारं लायनर नाही.
आयलायनर लावण्यातही एक मेख असते. ती म्हणजे आयलायनर आयश्ॉडोशी सुसंगत ठेवा. आयश्ॉडोतील पावडर पग्मेंट्स आयलायनरमधील तेलकट पग्मेंट्सना लॉक करतात. यासाठी छोटासा ब्रश वापरा. प्रायमरचा वापर केला तर त्वचेत सलगता दिसतेच; शिवाय मेक अपसाठी एक छान बेस तयार होतो आणि तो स्मिजिंगलाही प्रतिबंध करतो. त्यामुळे पापण्यांवर प्रायमरचा वापर करा.
Related Stories
September 3, 2024