अमरावती: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक आणि नाट्य समीक्षक डॉ. सतीश पावडे यांची महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने नाट्य सेन्सॉरबोर्डाच्या (रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ) सदस्यपदी नियुक्ती केली आहे.
डॉ. सतीश पावडे हे वर्धा येथील महात्मा गांधी इंटरनॅशनल हिंदी विद्यापिठाच्या परफॉर्मिंग आर्ट्स (फिल्म अँड थिएटर स्टडीज) विभागात वरीष्ठ सहायक प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. नाटक विषयक त्यांची 24 पुस्तके प्रसिद्ध झाली असून 30 नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांचे नावावर आहेत. 10 हून अधिक डॉक्युमेन्ट्रीज आणि शॉर्ट फिल्म्सचे लेखन दिग्दर्शन त्यांनी केले आहे. मराठी विश्वकोषाच्या नाट्य ज्ञान मंडळाचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
स्मिता पाटील स्मृती पुरस्कार, मॅग्नम ऑनर पुरस्कार, मामा वरेरकर, पु.भा.भावे पुरस्कारांसह युनेस्को क्लब्स आणि डे ड्रीम थिएटर एक्सेलंस ऑनर (श्रीलंका) या इंटरनॅशनल सन्मानानेही त्यांना यापूर्वी गौरविण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाचा उत्कृष्ठ नाट्य आणि नाट्य समीक्षा लेखनाचा पुरस्कार दोनदा त्यांना बहाल करण्यात आला आहे. तर कामगार मंडळाच्या राज्य नाट्यस्पर्धेत सर्वोत्कृष्ट नाट्यलेखनाचा पुरस्कार ही त्यांना तिनदा (हॅट्रिक) प्राप्त झाला आहे.
Related Stories
December 7, 2023