विदर्भ साहित्य संघाच्या वतीने देण्यात येणारा जीवनव्रती पुरस्कार डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला होता.पण आपल्या वैचारिक प्रगल्भ आंबेडकरवादी विचारांमुळे त्यांनी तो नाकारा याबद्दल डॉ.यशवंत मनोहर यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
विदर्भ साहित्य संघ मराठी साहित्याला वाहिलेली अग्रगण्य संस्था आहे.पण या संस्थेचा पाया हा प्राचीन मुलतत्ववादावर आधारीत आहे.ही संस्था वरवर परिवर्तनवादी दिसत असली तरी तीची चौकट पुराणमूल्यांना घेऊन चालणारी आहे.ही चौकट जर सरस्वती नाकारत नसेल व सावित्रीमाई स्वीकारत नसेल तर या संस्थेचे उद्दिष्टे बहुजन माणसाने समजून घ्यावे.
आंबेडकरवादी सारेच विचारवंत गुळगुळीत ,समरसतामय,भावनाशील नसतात तर ते क्रियाशील बंडखोर असतात.त्यात डॉ.यशवंत मनोहर हे आंबेडकरवादी साहित्यातील अग्रगण्य क्रांतीकारी लेखक आहेत.उत्थानगुंफा या काव्यलेखनापासून सूरू झालेला नकार , वेदना,विद्रोह,आवेग, ज्वाला,या आजपर्यंत शाभूूत आहेत.त्याचे लेखन मुलतत्ववादी ग्रंथाना व विचाराला जाळून टाकणारे आहेत.स्वतःला आंबेडकरवादी म्हणणे व संघाच्या समरसता मंचात सामील होणे ,विषमतावादी संघटनेला मदत करणाऱ्या महाभागाना जोरदार चपराक आहे.डॉ.यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार
- प्रा.संदीप गायकवाड
- कवी व समीक्षक
- नागपूर
- ९६३७३५७४००