- लेखणी माझी क्रांतिकारी
- मग ती पाळेल कसे मौन
- कवितेतूनच जाणून घ्या
- डॉ. मनोहर यशवंत कोण?
- बाबासाहेबांच्या विचारांनी
- भारावलेले चिंतनशील व्यक्ती
- मान्य कशी करतील मग
- काल्पनिक देवतेची भक्ती.
- व्रत घेतले जीवनभर पेरण्यास
- विचार महामानवाचे अती
- मग पटेल कशी त्यांना हो
- तुमची काल्पनिक देवी सरस्वती
- समाज परिवर्तनाची धमक
- सदाही त्यांच्या अंगी
- खंबीर नेतृत्व समाजाचे तत्पर
- लढण्यास लढाई विचारांची जंगी
- व्यवस्थेला उत्तर देणारा
- एक हजरजबाबी चेहरा
- आईच्या पोटी निपजतो
- असा एखादा मोहरा.
- सावित्री फातिमा शेख
- हीच खरी विद्येची देवी
- नकार देऊन पुरस्कारास
- क्रांती केली तुम्ही नवी
- बोले तैसा चाले खरोखरच
- अशी वंदनीय तुमची कृती
- पुरस्कार नाकारणारे एकमेव
- डॉ. यशवंत मनोहर जीवनव्रती
- -गणेश रामदास निकम
- चाळीसगाव गणेशपूर
- मो.न.७०५७९०४६७७, ९८३४३६१३६४
- *सदर कविता महान विचारवंत डॉ.यशवंत मनोहर जीवनव्रती पुरस्कार नाकारणारे यांच्या चरणी अर्पण*