अमरावती : कोरोना रुग्णामध्ये सातत्याने घट होत असताना आता कोरोनाचा डेल्टा प्लस हा नवीन प्रकार समोर आल्यामुळे पुन्हा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पहावयास मिळत आहे. जिल्ह्य़ात कोरोना रुग्णांची स्थिती ही नियंत्रणात असून आज ३८ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्य़ात एकूण ९५ हजार ८११ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. २ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यत १ हजार ७२६ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. ९३ हजार ६६५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असुन ५९७ रुग्णावर उपचार सुरू आहे.
कोरोनाची पहिली व दुसरी लाट शमविल्यानंतर आता तिसर्या लाटेचा धोका बळावला असुन कोरोनाच्या डेल्टा प्लस हा प्रकार समोर आला असून शासनाने या संदर्भात नविन निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे पुन्हा आता तीच भिती आणि तोच धोका निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तणावाचा वातावरण पहावयास मिळत आहे. अमरावती जिल्ह्य़ात कोरोनाचा प्रभाव जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर असताना आता पुन्हा तिसर्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येणार्या दिवसामध्ये नेमकी परिस्थिती कशी बदलणार याचा अंदाज बांधने आता अशक्य झाल्याचे दिसुन येत आहे. २५ जून रोजी जिल्हयात ३८ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून आतापर्यत ९५ हजार ८११ रुग्णांना कोरोनाची लागन झाल्याचे दिसून येत आहे. ९३ हजार ६६५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ५९७ रुग्णांवर उपचार सुरू आहे. २ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यत जिल्ह्य़ात १ हजार ७२६ रुग्ण हे कोरोनामुळे दगावले आहेत.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024