अवघे एक रूतलेले मूळ
होता विटाळ शूद्रांचा
मग विटाळले रे ! त्यांच
महाडच चवदार तळ
या मनूवादी तत्वाने
कशी लाविली ही कळ
बाबासाहेबांनी केला संगर
दिले आंम्हा अस्तित्वाचे बळ
वर्णवादी वेदोक्त संस्कृतिने
केला होता हा आमचा
कसा ठायी ठायी छळ
सर्वांगावर उठले त्याचे आजही हो त्याचे वळ
युगांतराची अमानुषता ही कोरली हरेक काळजात यांनी
धर्मधुंदी, वर्णभेदी जातियता
गाव, शहर, वस्ती, माणसात फुलारली छाताडावर नाचली बिनदिक्कत
मूठमाती तव दिली तीला
या संविधान ग्रंथातूनी
बटीक ती या सवर्ण शिडीची
तरी ढडोके काढते अधून मधूनी
आजही तिचे रूपे सैरभैर
ऊच निचतेची रंगित तालीम
गाव खेड्यात चालू आहे ऊसनवारी पाटीलशाही
कुणा आर्शिवादे चालू आहे
बाबासाहेब !
तुमच्या तत्वाची ढाल आंम्ही
तशी रोजच पांघरत असतो
माञ एन मोक्याच्या समयी
आंम्ही माञ खेमा बदलत असतो
आपण समजून घ्यावी
आता विटाळाची परिभाषा
डिस्किक्रिमिनेशन संपले नाही
ते करतात त्याची हो
क्षणोक्षणि नशाss
– शिवा प्रधान
अमरावती