- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : भारतीय डाक खात्यामार्फत मंगळवार, दि.27 सप्टेंबर रोजी अमरावती प्रवर अधीक्षक डाकघर यांच्या कार्यालयमध्ये दुपारी 4 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. या डाक अदालतीत तक्रारी सादर करण्याची अंतिम मुदत 16 सप्टेंबरपर्यंत असून संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.
डाक अदालतमध्ये अमरावती विभागातील पोस्टाच्या कामासंबधी विशेषत: स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, रजिस्टर पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर संबंधीत तक्रारींचा समावेश राहील. ज्या तक्रारींचे निराकारण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल तसेच समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची नोंद येथे घेतली जाईल. तक्रार करतांना तक्रारींचा सर्व तपशील जसे तक्रार केल्याची तारीख, ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादी माहिती तक्रारीमध्ये उल्लेख करून पाठवावेत. सर्व संबंधितांनी आपले अर्ज अमरावती प्रवर अधीक्षक डाकघर 444602 यांच्या नावे दि.16 सप्टेंबर किंवा तत्पूर्वी पोहोचतील, अशा बेताने पाठवावे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही, असे डाक विभागामार्फत कळविण्यात आले आहे.