चांदूरबाजार : स्थानिक गो. सी. टोम्पे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय चांदूरबाजार येथे वन्यजीव सप्ताहानिमित्त एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला उद्घाटक म्हणून डॉक्टर कुलकर्णी माजी संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र शासन कथा माजी कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आले होते तर प्रमुख वक्ते या प्राध्यापक डॉक्टर अर्चना महाकाळकर डिपार्टमेंट ऑफ फोरन्सिक बायोलॉजी शासकीय इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स नागपूर यांनी रोल ऑफ फॉरेन्सिक इन सस्टेनिंग वाईल्डलाइफ या विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके व डॉ. नंदकिशोर गव्हाळे प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. डॉ युगंधरा गुल्हाने राजगुरे यांनी कार्यक्रमाची आयोजना मागची रूपरेषा सांगत जैवविविधता सर्वसामान्य जनतेला कळणे व त्याची जनजागृती करणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ. के. एम. कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करत वन्यजीव या पृथ्वीतलावरील एक घटक असून त्यांचे स्थलांतर, त्यांची मानसिकता, त्यांचे वागणूक यावर अभ्यास व्हावा आणि मानवी वस्तीमध्ये त्यांचे हल्ले जैवविविधतेच्या असमतोलपणाचे उदारहण असून सर्वांनी पुढाकार घेत वन्यजीव सप्ताहानिमित्त जैवविविधता व पर्यावरणाला वाचविण्याचे आपण प्रयत्न करावे असे मत मांडले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा. अर्चना अर्चना महाकाळकर यांनी देशात सर्वप्रथम 1957 पासून वन्यजीव सप्ताहाचे आयोजन सुरू झाले असून वन्यजीव संरक्षणात लोकांना सहभागी करून घेत वन्यप्राण्यांना अभय देण्याच्या प्रयत्नांना चालना देण्याच्या उद्देशाने हा वन्यजीव सप्ताह सुरू केल्या गेला. दरवर्षी हा वन्यजीव सप्ताह महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून २ ते ८ ऑक्टोबरपर्यंत साजरा केला जातो. वन्य प्राण्यांचे होणारे काही प्रथा आणि धार्मिक समजुतीमुळे वन्यजीवांच्या हत्या होतात. त्या थांबवण्याची गरज मांडत फॉरेन्सिक डिपारमेंट वन्य प्राण्यांची होत असलेली हत्या बारकोडींग, मॉलिक्युलर पद्धतीने कशी शोध घेते तसेच नेमकं मुत्युचे कारण, मृत्यूची वेळ आणि नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा खुलासा केला तसेच सामन्य जनतेने ठरवले तर वन्यजीव प्राण्यांना वाचवण्याकरता महत्त्वाचा सहभाग झाल्यास जैवविविधता संवर्धनाने खुप मोठा बदल घडवून आणू शकता येईल व त्यासाठी जनजागृती करता येईल असे प्रतिपादन प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. अर्चना महाकळकर यानी केले. या सप्ताहाच्या माध्यमातून जैविक विविधता व वन्यप्राण्यांचे संरक्षण व संवर्धन संकल्प लोकमानसात रुजविण्याचा प्रयत्न करण्यात यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मंगेश अडगोकर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. उमेश कनेरकर यांनी केले. प्रा. डॉ. प्रफुल चौधरी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेची बहुसंख्य स्वयंसेवक, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने आभासी पद्धतीने झालेल्या कार्यक्रमात उपस्थित होते.