चांदूर बाजार: स्थानिक गो. सी. टोम्पे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना तर्फे भारतीय संविधानचे शिल्पकार प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. संजय शेजव तसेच इतर मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व तेजस्वी विचार पिढ्यांपिढ्यासाठी मार्गदर्शक आहेत असे मत मांडलेत. तर समस्त बहुजन समाजाचे उध्दारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामूळे शिक्षणाची गंगा घरोघरी गेली असून त्यांच्या विचारांमूळेच समाजामध्ये परिवर्तन होत असे प्रतिपादन प्रा. डाॅ. नंदकिशोर ग्व्हाळे समन्वयक, आयक्युएसी यांनी केले. या प्रसंगी प्रा. डॉ. सुभाष सिरसाठ सरांनी बाबासाहेबंचे कर्तुत्व किती महान होते व ते आत्मसात करण्याकरता रोज त्यांच्या लिखानाचे वाचन करण्याचे आव्हान विध्यार्थांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. युगंधरा गुल्हाने, रासेयो, महिला कार्यक्रम अधिकारी तर आभार प्रा. डॉ. मंगेश अडगोकर, रासेयो,कार्यक्रम अधिकारी यांनी व्यक्त केले कार्यक्रमाला प्रा. डॉ. प्रफुल चौधरी, रासेयो, सहकार्यक्रम अधिकारी, प्रा. धनंजय बिजवे, प्रा. ज्ञानेश्वर वारंगे, प्रा. सुभाष सिरसाठ, प्रा. उबरहांडे, प्रा. ज्योती चोरे, प्रा. प्रिया देवळे, श्री अमित जांगजुळे, प्रा. मंजूषा पवार, बहुसंख्य प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते