Sunday, December 7

टायफॉइडबाबत घ्या काळजी…!

Taifide

टायफॉइड हा एक जटील विकार असून त्याला विषमज्वर किंवा मुदतीचा ताप या नावानेही ओळखतात. ‘साल्मोनेला टायफ’ नावाच्या जिवाणुंमुळे होणार्‍या या आजारात रुग्णाला भयंकर ताप येतो. हा ताप सुमारे तीन आठवडे राहतो. अर्थात त्वरित उपचार घेतल्यास रोग लवकर आटोक्यात येतो. मात्र उपचार न घेतल्यास रोगी मरण पावण्याची शक्यताही असते. म्हणूनच या आजाराची दहशत बघायला मिळते. या रोगात सतत जास्त ताप असतो, थकवाही जास्त येतो, पोट दुखतं. दुसरं म्हणजे साधारणत कोणत्याही तापामध्ये नाडीचा दर वाढलेला असतो. विषमज्वरात मात्र तापाच्या मानाने नाडीचा दर कमी असतो. हे रोगाच्या निदानासाठी खूप महत्त्वाचं आहे. टायफॉइड झालेल्या रुग्णाच्या विष्ठेतून या रोगाचे जिवाणू बाहेर पडतात.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

या विष्ठेचा अन्न, पाणी किंवा हाताशी संपर्क आल्यास दूषित अन्न, पाणी वापरणार्‍या व्यक्तंीच्या पोटात ते जीवाणू प्रवेश करतात. माशादेखील विष्ठेतील जीवाणू उघड्यावर ठेवलेल्या अन्नपदार्थांपर्यंत पोचवतात. हे जंतू निरोगी माणसाच्या आतड्यात पोहोचल्यानंतर लसिकाग्रंथीमध्ये वाढतात आणि तेथून रक्तात जातात. कालांतराने विषमज्वराची सर्व लक्षणे दिसून येतात. शरीरात जिवाणूंचा प्रवेश होऊनदेखील काही व्यक्तींना रोग होत नाही. मात्र त्यांना आजार होत नसला, तरी मलावाटे जिवाणू बाहेर पडत असतात. म्हणूनच या लोकांना रोगवाहक असं म्हणतात.

टायफॉइड आहार: विषमज्वरात कोणते पदार्थ खावे आणि टाळावेत?

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.

Leave a Reply