अमरावती : अमरावती शहरातील शिवाजीनगर परिसरासह जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर व जरूड येथे उपडाकघरासाठी भाडेतत्वावर जागा मिळण्यासाठी टपाल कार्यालयाकडून मोहोरबंद निविदा मागविण्यात आल्या आहेत.
अमरावतीतील शिवाजीनगरात भाडेतत्वावर 914 चौरस फुट चटई क्षेत्र व 236 चौरस फूट सायकलशेडसाठी अशी जागा आवश्यक असून, 20 जानेवारीपूर्वी निविदा सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जरूड येथे 491 चौरस फूट चटई क्षेत्र व 48 चौ. फूट सायकलशेडसाठी जागा आवश्यक असून, 20 जानेवारीपूर्वी निविदा पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मंगरूळ दस्तगीर येथे उपडाकघरासाठी 379 चौरस फूट चटई क्षेत्राची व 48 चौरस फूट सायकल शेडसाठी जागा आवश्यक असून, संबंधितांनी 25 जानेवारी रोजी दुपारी तीनपर्यंत मोहोरबंद निविदा सादर कराव्यात, असे आवाहन प्रवर अधिक्षकांनी केले आहे.
Related Stories
October 9, 2024