अमरावती : मूर्तिजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा माना बेसिक येथे 72वा प्रजासत्ताक दिन नुकताच साजरा करण्यात आला.याप्रसंगी शहीद संजय खंडारे यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पन जि. प. सदस्या रिजवाना परवीन शेख मुखतार, प. स. सदस्य रवींद्रभाऊ घुरडे, सरपंच सौ. वंदनातताई सतीश मोखडकर, शाळा व्येवस्थापन समिती अध्यक्षा सौ. सुनंदाताई प्रमोद गायकवाड, यांनी केले. त्यानंतर ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक सुरेश किसनराव बोरकर यांनी केले. भारतीय राज्य घटनेच्या प्रस्ताविकेचे वाचन घेण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन व आभार नितीन वाघमारे, रांगोळी सुशोभन मेघना पिसे वाडकर, भाग्यश्री उके यांनी केले. कार्यक्रमाला ग्रा. प. सदस्य सतिशभाऊ मोखडकर, ग्रा. प. सदस्या सौ. अनिता राजरत्न राऊत, ग्रा. प. सदस्य निलेशभाऊ तायडे, ग्रा. प. सदस्य राव हारून दाऊद, समाजसेवक मुखतार शेख, शाळा समिती सदस्या सौ. अस्मिता इंगळे, शाळा समिती सदस्य ईश्वरलाल शेंद्रे, शापोआ कर्मचारी सविता डाखोरे, अंगणवाडीताई शिला वाकोडे, अंगणवाडीताई नंदाताई डांगे, मदतनीस बेबीताई मेहरे इ. हजर होते.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024
September 5, 2024