अमरावती : जिल्ह्यात पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ पहावयास मिळाली असून, ४ एप्रिल रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ३0३ रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. परिणामी, जिल्ह्यात आतापर्यंत ४९ हजार ८२६ कोरोनाग्रस्त आढळून आले आहे. ४५ हजारपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, ४ हजारच्या जवळपास रुग्णांवर उपचार सुरू आहे. ६८७ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला असून , ५ एप्रिलपासून हे कडक निर्बंध लावण्यात येणार आहे. राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू असून, यावेळी अमरावती जिल्ह्यात मात्र कोरोना रुग्णांची संख्या सध्यातरी नियंत्रणात असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यामुळे रुग्णांच्या संख्येत कमी जास्त प्रमाणात भर पडत होती. विशेष म्हणजे लॉकडाऊनची परिस्थीती ओढावली असताना देखिल जिल्ह्यात प्रशासनाने आखुन दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे बाजारपेठामध्ये सर्रासपणे दिसून येत आहे.४ एप्रिल रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ३0३ रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ४९ हजार ८२६ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळून आले आहे. परिणामी, जिल्ह्यात आतापर्यंत ४९ हजार ८२६ कोरोनाग्रस्त आढळून आले आहे. ४५ हजारच्या जवळपास रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असुन ४ हजारच्या जवळपास रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात मृतकांची संख्या ही मोठय़ाप्रमाणात वाढत असल्यामुळे प्रशासनासमोर मृतकांचा आकडा कमी करण्याचे अवाहन निर्माण झाले आहे. ६८७ रुग्णांचाआतापर्यत मृत्यू झाला आहे.